हे फक्त व्याज आहे.... मुद्दल कसे फेडणार हा तर भीषण प्रश्न आहे. १९४७ ते २००९ या ६२ वर्षांच्या कालावधीत आपल्या सर्व सरकारांनी प्रचंड प्रमाणात कर्जे घेतली आणि ती फेडायची जबाबदारी पुढच्या सरकारांवर टाकून मोकळे झाले. भविष्यात आपल्या देशाला स्वयंपूर्ण आणि बलवान बनवण्याचे ध्येय केवळ भाषणात ठेऊन उलट देशाला अधिकाधिक लाचार आणि इतरांवर अवलंबून ठेवण्याचे दुष्कृत्य आजपर्यंत च्या आपल्या राज्यकर्त्यांनी केले आहे. शिवाय याविषयी कधी कोणत्या विरोधी पक्षांनीही आवाज उठवला नाही. उलट सत्तेत येऊन त्यांनीही तेच केला जे कायम चालू होते. सरकारला मते मिळवण्यासाठी ज्या दिखाऊ योजना आखाव्या लागतात त्यासाठीचा पैसा या कर्जान्मधून उभा केला गेला... त्यातला बराचसा पैसा राजकारण्याच्या खिशात आणि त्यांच्या स्विस बँकांमध्ये गेला. आणि कर्जावरचे व्याज फेडण्याची जबाबदारी मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेवर येऊन पडली... म्हणजेच पर्यायाने देशातल्या गरीब जनतेवर येऊन पडली. प्रत्येक वेळी सरकार कर्जे घेत आहे.. त्यावरचे व्याज फेडण्याची जबाबदारी भविष्य काळावर सोपवून मोकळे होत आहे. आपणच आपल्या देशातल्या भावी पिढ्यान समोर गंभीर आर्थिक राक्षस उभा करत आहोत याची पुसटशी तरी जाणीव या राज्यकर्त्यांना आहे कि नाही असा प्रश्न पडतो.
मराठीत एक म्हण आहे... अंथरूण पाहून पाय पसरावेत... परंतु हे आमच्या सरकारला कळेल तर ना.... आमचे सरकार आज खर्च आधी ठरवते आणि त्याला लागणारा पैसा हा "कर्ज" घेऊन उभा करते.... यापेक्षा अधिक मूर्खपणा काय असू शकतो...?? कोणताही अडाणी माणूस सुद्धा आपल्या कुवतीनुसार खर्च करतो.... आधी आपल्याकडे असणारे पैसे मिळणारे पैसे याचा अंदाज घेतो आणि मग खर्च करतो... पण आपले महाभाग अंदाज पत्रकात पैशाचे अंदाज न ठरवता आधी योजना ठरवतात...! जगातल्या कोणत्या माणसाने हे शहाणपण या लोकांना शिकवले आहे याची कल्पना नाही... शिवाय हे कर्ज घेऊन या लोकांनी देशाचे काही भले केले आहे असेही नाही.... उलट देशाची परिस्थिती अधिकाधिक खालावतच गेली आहे... राजकारण तर इतक्या खालच्या थराला गेले आहे कि ५०% जनताही मतदानाला बाहेर पडत नाही. प्रचंड पैशाचा अपव्यय करून देशाची वाट लावण्यात प्रत्येक राजकीय पक्षाने हिरीरीने सहभाग घेतला आहे....
१९९१ चे गुन्हेगार....
देशाची आर्थिक परिस्थिती चांगलीच खालावली होती. राजीव गांधी यांचे सरकार केंद्रात होते. मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. याचवेळी भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. देशाला आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीकोनातून रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले.... १७ रुपयाला एक डौलर असा दर असताना अचानक तो ३५ रुपयांवर गेला.... दुपटीपेक्षा जास्त...!! आज आपण एका डौलर साठी ४५ रुपये मोजतो.... यांमुळे नेमके काय झाले? भारताने जे काही परकीय कर्ज घेतले होते ते होते डौलर मध्ये... कर्ज जर १ डौलर चे असेल तर १७ च रुपये कर्ज फेडताना परत करावे लागत होते आता मात्र ३५ रुपये द्यायला लागू लागले.... म्हणजे काही न करता अवघ्या काही दिवसात भारताचे कर्ज दुप्पट झाले..... हा तोटा "अर्थतज्ञ" मनमोहनसिंग भरून देणार आहेत काय?? की राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी देशाच्या या नुकसानाची भरपाई देणार आहेत..??? मी कॉंग्रेस वर टीका करतो आहे याचा अर्थ त्यांचे विरोधक धुतल्या तांदुळासारखे आहेत असे मुळीच नाही... विरोधी पक्षाची असलेली कर्तव्ये या लोकांनी केली कुठे? असे काही होत आहे हे दिसत असूनही प्रखर विरोध करून देशात या देशद्रोह्यन्विरुद्ध आवाज का नाही उठवला.... खिशात एक पैसाही नसलेल्या मनुष्याला खायला अन्न कसे मिळेल हा विचार सोडून त्याच्या डोक्यात धार्मिक भूत भरवण्याचे काम मात्र या लोकांनी अगदी नेटाने केले.
जोपर्यंत सामान्य माणसाला या सगळ्या भीषण अवस्थेची जाणीव होत नाही आणि असे अनेक सामान्य एकत्र येत नाहीत तोपर्यंत लोकशाहीची असामान्य ताकद आपल्या प्रत्ययास येणार नाही. चाकोरीबाहेर जाऊन विचार करायची आज गरज आहे. लहान पणापासून शिकवले गेल्यासारखे किंवा पढवले गेल्यासारखे अनेक सुशिक्षित लोक मतदान करतात... आपल्यासमोरचा उमेदवार कोण आहे कसा आहे याचा पूर्ण विचार न करताच त्याला आपण खाकी चड्डी घालून दसऱ्याला संचालन करतो म्हणून निवडून द्यावा का? किंवा केवळ एखादा मनुष्य अर्थशास्त्रातला तज्ञ आहे म्हणून आपण त्याच्या पक्षाच्या सर्व महामूर्ख आणि भ्रष्ट उमेदवारांना निवडून द्यावे का?? हे विचार ज्या वेळी सामान्य माणसाच्या डोक्यात येतील तेंव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित झाली असं म्हणता येईल.... तोपर्यंत हि तर केवळ झुंडशाही..... पैशाच्या जोरावर पोसलेली....!
-तन्मय कानिटकर
नुकताच केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे...
ReplyDeleteमला काही गोष्टी आवर्जून नमूद कराव्या वाटतात....
१९५० पासून २००९ पर्यंत च्या एकाही अर्थमंत्र्यांनी खर्चात कपात किंवा cost cutting या गोष्टीवर कधीच कसा भर दिला नाही???
असे आर्थिक व्यवहार अडाणी माणूस सुद्धा करत नाही. पण गेली सहा दशके आपले मंत्री लोक हेच करत आलेत.....
अर्थसंकल्प २००९ नुसार भारताच्या एकूण खर्चामधील सुमारे १९% रुपये आपण केवळ "व्याज" म्हणून खर्च करणार आहोत....
भरमसाठ योजना आणि आभासी अर्थव्यवस्था उभी करणे ही गोष्ट आपल्या राजकारण्यांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की आपण काही चूक करतो आहोत याची त्यांना पुसटशी जाणीवही होत नाही. शिवाय आपल्या इकडचे "नावाजलेले" अर्थतज्ञ अमेरिका आणि पश्चिमी विचारांचे आहेत. परंतु तशा विचारांमुळे आत्ता नुकताच तिकडे जे काही आर्थिक संकट आले त्यातूनही आपले तज्ञ लोक शहाणे होण्यास तयार नाहीत.....
कर्ज घेऊन आपल्याकडे खूप पैसा आहे हे लोकांना दाखवण्याचा खटाटोप फक्त केंद्र सरकार नव्हे तर स्थानिक पातळीवरही चालू आहे... महापालिका सुद्धा कर्जत बुडलेली आहे...
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सर्वच उमेदवारांनी खूप सारी आश्वासने दिली आणि खूप सारी कामे आपण करू असे सांगितले... आणि या सगळ्या कामांसाठी पैसा कोठून आणू?? तर कर्ज काढू.......... यांचा काय जातं फेडायला बसलेत लोक..... वर्षानुवर्षे कर्ज सच्ताय... व्याज वाढतंय.... अर्थव्यवस्था कर्जाच्या दलदलीत फासत चाललीये.... आणि दुर्दैवाची गोष्ट हि की याची जराही कल्पना लोकांना नाही......