मात्र महाविद्यालयाने पाठवलेल्या शुल्क प्रस्तावाची शहानिशा करण्याची कोणतीही यंत्रणा शिक्षण शुल्कसमितीकडे नाही. त्यामुळे महाविद्यालयाने जे काही कागदावर दाखवलेले असेल त्याच्या आधारेच अंतिम शुल्कठरवले जाते. म्हणूनच एकूणच शुल्क ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही २ गोष्टींची मागणी केली आहे.
विद्यार्थी आणि पालकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा या विषयाला आत्तापर्यंत राज्य शासन आणि शिक्षण शुल्कसमिती यांनी किंमत दिली नसल्याचे दिसून आले आहे. आणि म्हणूनच अखेर रस्त्यावर उतरून प्रतीकात्मकआंदोलन करायचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण शुल्क समितीचा व्यवहार पारदर्शक असावा या मागणीसाठी, शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट, २०१० रोजी संध्याकाळी ५.३० वाजता गुडलक चौक (डेक्कन जिमखान्याजवळ) येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहा...!!
पारदर्शक व्यवहाराशिवाय भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा बाजार थांबणार नाही...!