शिक्षण शुल्क समितीच्या कारभारात पारदर्शकता असलीच पाहिजे...
शिक्षण शुल्क समिती हि राज्यातील सर्व महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवते. यामध्ये MBA, MCA, BCS, Engineering, Medical, Pharmacy या सर्वांचा समावेश होतो. एखाद्या अभ्यासक्रमाचेशुल्क ठरवताना महाविद्यालय शुल्क प्रस्ताव समितीकडे पाठवते, त्यामध्ये एकूण पायाभूत सोयी सुविधा त्यांचाखर्च इत्यादींचा समावेश असतो. शिक्षण शुल्क समिती एकूण सोयी सुविधा, प्राध्यापकांची संख्या, विद्यार्थ्यांचीसंख्या अशा विविध बाबी लक्षात घेऊन अंतिम शुल्क निश्चित करते.
मात्र महाविद्यालयाने पाठवलेल्या शुल्क प्रस्तावाची शहानिशा करण्याची कोणतीही यंत्रणा शिक्षण शुल्कसमितीकडे नाही. त्यामुळे महाविद्यालयाने जे काही कागदावर दाखवलेले असेल त्याच्या आधारेच अंतिम शुल्कठरवले जाते. म्हणूनच एकूणच शुल्क ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही २ गोष्टींची मागणी केली आहे.
१) प्रत्येक महाविद्यालयाने सादर केलेला शुल्क प्रस्ताव (fee proposal) शिक्षण शुल्क समितीच्याच वेबसाईट वरविद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हावा. म्हणजे शहानिशा करण्याचे काम प्रत्यक्ष विद्यार्थीच करू शकतील.
२) शिक्षण शुल्क समितीने महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावावर केलेला विचार व काम (worksheet) हेसुद्धा विद्यार्थ्यांसाठी वेबसाईट वरच उपलब्ध केले पाहिजे...
विद्यार्थी आणि पालकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा या विषयाला आत्तापर्यंत राज्य शासन आणि शिक्षण शुल्कसमिती यांनी किंमत दिली नसल्याचे दिसून आले आहे. आणि म्हणूनच अखेर रस्त्यावर उतरून प्रतीकात्मकआंदोलन करायचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण शुल्क समितीचा व्यवहार पारदर्शक असावा या मागणीसाठी, शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट, २०१० रोजी संध्याकाळी ५.३० वाजता गुडलक चौक (डेक्कन जिमखान्याजवळ) येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहा...!!
पारदर्शक व्यवहाराशिवाय भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा बाजार थांबणार नाही...!
Good point..change the reactions below the post(funny interesting or cool?)
ReplyDelete