मी वर्षात एक परिवर्तन घडवणारच....!
असा दृढ निश्चय आपण करू शकतो??
एका अधिकाऱ्याचा गैर कारभार उघडकीस आणला...
एका सरकारी ऑफिस मध्ये चालू सावळा गोंधळ थांबवला...
एका शासकीय विभागाला मदत करून त्यांच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ केली...
एका चुकीच्या सरकारी धोरणाला विरोध करून ते बदलणे सरकारला भाग पाडले..
एक योग्य आणि आवश्यक असा धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यायला लावला...
एक तरी परिवर्तन मी या वर्षात घडवले...!! आणि पुढच्या वर्षातही किमान एक परिवर्तन मी घडवणारच...!!
३६५ दिवसांमध्ये केवळ एका परिवर्तनाची जबाबदारी आपल्यातला प्रत्येक जण घेऊ शकत नाही????
आणि याला जर तुमचे उत्तर नकारार्थी असेल तर भारत २०२० मध्ये महासत्ता बनल्याचे स्वप्न पहायचा तुम्हाला अधिकार नाही... तुमच्या घरी कोणी चोरी केली तरी त्याची तक्रार करायचा तुम्हाला अधिकार नाही... तुमच्या घराच्या खिडकीत तुमच्याच कडून हप्ता वसूल करून नाक्यावरच्या गुंडाने स्वतःच्या वाढदिवसाला फ्लेक्स लावला तरी तुम्हाला त्याला शिव्या घालायचा अधिकार नाही...आयुष्यभर प्रामाणिक राहूनही लाचखोरी केल्याबद्दल तुम्हालाच पोलिसांनी आत टाकले तरी त्याविरोधात बोलायचा अधिकार तुम्हाला नाही...दुधातल्या भेसळीमुळे तुमचेच पोरगे मेले तरी रडायचा तुम्हाला अधिकार नाही... धान्यापासून बनलेल्या दारूमुळे तुमचाच मुलगा वाया गेला तरी तुम्हाला त्याला रागवायचा अधिकार नाही... पेट्रोल मधल्या भेसळीमुळे तुमची दुचाकी खराब झाली तरी वैतागायचा तुम्हाला अधिकार नाही... राजकीय गुंडांनी तुमच्याच पोरीला उचलून नेले तरी त्याविरोधी चकार शब्द काढायचा तुम्हाला अधिकार नाही...
No comments:
Post a Comment